शिर्डीतून परकीय चलन गेले चोरीला

शिर्डी : शिर्डीतील एका तारांकित हॉटेलमधून एका परदेशी भाविकाचे २ हजार ८२० युरो परकीय चलन ( २ लाख २५ हजार) अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली.
याबाबत शिर्डी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ डिसेंबरला हॉलंडच्या वीर महादेव सिंग खोसला आपल्या कुटुंबासह शिर्डीत गोराडिया या तारांकित हॉटेलमध्ये आले होते.
दरम्यान हॉटेलच्या खिडकीतून ही रक्कम चोरली असल्याची फिर्याद खोसला यांनी केली आहे. भाविकाने आपले चोरी गेलेल्या रकमेबद्दल हॉटेल व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. फिर्यादी वीर महादेव सिंग खोसला यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा