शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत

पुणे: शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे एक नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
महीन्यापुर्वी सरदवाडी येथील एका लहान मुलीला बिबट्याने ठार केले होते. त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. वन विभागाने या परीसरात सात पिंजरे लावले होते . गेल्या दहा दिवसापुर्वी त्यामधे एक बिबट्या सापडला होता . त्यानंतर लगेच दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
वनकर्मचाऱ्यानी त्याला माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात सोडले आहे.
घोड व कुकडी नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. त्यात जांबुत, वडनेर, टाकळी हाजी, निमगाव दुडे, कवठे येमाई परीसरात मोठया प्रमाणात बिबट्याचे अनेक वेळा दर्शन होते.
जांबुत परीसरात तर बिबट्याने ठाणचं मांडले असुन, या पुर्वी अनेक जनांच्या वर हल्ले झाले तर नदीपलीकडे चोंभुत (ता.
पारनेर) हद्दीमध्ये गेल्या वर्षी शेतात काम करणाऱ्या महीलेवर हल्ला करून ठार केले होते . तसेच मेंढपाळाच्या कळपावर हल्ले करून शेळ्या मेंढया, शेतकऱ्यांची जनावरी , कुत्रे फस्त करण्यांचे प्रकार रोजचं या परीसरामधील गावांत घडत आहे.
बिबटयांच्या भितीमुळे शेतकरी रात्री घराबाहेर पडणे अवघड झाले असुन, कधी बिबटया हल्ला करीन त्यांचा भरोसा नाही . त्यामुळे शेतकऱ्याला शेतीसाठी दिवसा विज दया , अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार गावडे यांनी दिला आहे .
या परीसरात बिबटया पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले असुन, ग्रामस्थांना बिबटया दिसल्यास वन विभाग शिरूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वन परीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा