शिरूर तालुक्यातून दुचाकी चोरांना गाड्यांसह पकडले

पुणे: शिरूर तालुक्यात मोटार सायकल चोरांनी धुमाकुळ घातला आहेत. नागरिकांच्या गाड्या चोरीला जात होत्या. याबाबत पोलिसही या गाडी चोरांच्या शोधात होते. मात्र रांजणगाव पोलिसांनी गाडी चोरापैकी दोघांना १९ गाड्यांसह पोलिसांनी गजाआड केल्याने जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे .
शिरूर तालुक्यामध्ये चोरीचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मोटार सायकलीची चोरीची तक्रार तर नित्याचीच झाली आहे. त्यामुळे शिरूर पोलिसांपुढे मोटार सायकल चोरांना पकडण्याचे आव्हान होते. ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी ही याबाबत मोटार सायकल चोरीवर प्रतिबंध घालण्याचे आदेश जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. यामध्ये रांजणगाव पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार कामगिरी करीत शिरूर, शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हे उघडकीस आणले आहे.
याबाबत उपविभागिय पोलिस अधिकारी सचिन बारी, रांजणगाव गणपती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी प्रफुल्ल कदम , पोलिस हवालदार तुषार पंधारे, अजित भुजबळ मंगेश थिगळे प्रफुल्ल भगत यांनी मोलाची कामगिरी केली .
या प्रकरणी शिरुर येथुन अनिल विठ्ठल वेताळ व आकाश बबन चित्तर या दोन तरुणांना अटक करून १९ गाडया ताब्यात घेतल्या आहेत . त्यामधे दहा लाख ६७ हजार रुपये किमंतीची ही मोटार सायकली आहे.एवढया मोठया प्रमाणात तालुक्यात पहिल्यांदाच गाडया सापडल्याने जनतेमधुन पोलिसाचे कौतुक होत आहे .
याबाबत पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत म्हणाले की, नागरीकानी वाहने पार्कींग मध्ये तसेच सिसीटीव्ही अंतर्गत लावावी. असे आवाहन त्यांनी केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा