इंदापूर, दि.३ जानेवारी २०२१ : रविवारी सकाळी इंदापूर अकलूज रस्त्यावर विठ्ठलवाडी येथे मालवाहतूक ट्रक व कारच्या झालेल्या भीषण अपघातात खडकी पुणे येथील पांडुरंग सिताराम ताथवडे (वय ५८ वर्षे) व रुक्मिणी पांडुरंग ताथवडे (वय ५०वर्षे) दोन्ही राहणार खडकी पुणे, मूळ गाव केंदूर पाबळ तालुका शिरूर जिल्हा पुणे) हे दांपत्य जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की कारचे पत्रे तोडून दोघांचे मृतदेह बाहेर काढावे लागले.
यासंदर्भात इंदापुर मधील रुग्णवाहिका चालक नितीन पांडुरंग खिलारे यांनी पोलिसांना खबर दिली. सकाळी खिलारे हे त्यांची रुग्णवाहिका घेऊन अकलूज कडे जात असताना इंदापूर अकलूज रस्त्यावर विठ्ठलवाडी नजीक एका वळणावर मालवाहतूक ट्रक (एम एच १२ एम एम ७४३४) व टाटा कार क्रमांक (एम एच १२ कु एफ २६६२) यामध्ये अपघात झाला. मालवाहतूक ट्रकचालक अपघात होताच फरार झाला.
कारमधील दांपत्य जागीच ठार झाले होते.यानंतर प्रवाष्यानी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली दरम्यान या घटनेप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास इंदापूर पोलिस करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे