नागपूर, २२ फेब्रुवारी २०२४ : शिवजन्मोत्सव समिती दक्षिण नागपूर (मानेवाडा) बेसा रोड येथील परिवर्तन चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव साजरा केला गेला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आगमन होताच जय शिवाजी, जय भवानी चा गजर ही गजर झाला. गडकरी यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन करत मानवंदना दिली.
अखंड हिंदुस्थानातील शिवरायांना आपण आराध्य दैवत मानतो. आपल्या जीवनात आई -वडिलांना जसं आपण मानतो तसेच आपण शिवछत्रपती महाराजांना आराध्य दैवत मानतो. शिवरायांचे पूर्ण जगात व आपल्या भारत देशात एक नंबरचं नाव आहे, ते भविष्यातही राहिलं पाहिजे. आपल्या व समाजाच्या माध्यमातून ते पोहोचविण्याचे काम आपण केलं पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवरायांची मूर्ति देऊन सौ. मंगलाताई खेकरे व शशांक खेकरे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत व सत्कार केला. दक्षिण नागपूरचे आमदार मोहनभाऊ मते यांचेही स्वागत व सत्कार सौ. मंगलाताई खेकरे आणि शशांक खेकरे यांनी मुर्ती देऊन केला. यावेळी मोहन मते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण, नामस्मरण प्रत्येक घराघरात करावे. तसेच आपण एकत्रित येऊन शिवजयंती साजरी करावी असे सांगितले. या कार्यक्रमाचे संयोजक शंशांक खेकरे व मित्र परिवारानी केले. दुपारी झालेल्या वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या बाल कलाकारांना व महिलांना पारितोषिके वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, दक्षिणेचे आमदार मोहन मते, शहराध्यक्ष बंटी कुकडे, संजयजी भेंडे, सौ. मंगलाताई खेकरे आणि शशांक खेकरे, त्यांचे मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे