हवेलीतील कोरोना संकटग्रस्तनसाठी शिवसैनिक मदतीला आला धाऊन

4

कुंजीरवाडी, दि. ११ जुलै २०२०: आज वार शनिवार दि. ११ जुलै २०२० रोजी कुंजीरवाडी येथिल एक असा ही एक अवलिया शिवसैनिक व शिवसैनिकाचे कुटुंब कोरोना महामारीमुळे लोक जेव्हा जवळच्या नातेवाईकनशि आपल्या घरातील मांनसाशी बोलायला व जवळ थांबायला ही घबरत आहेत. शिवसेनेचे माजी तालुका संघटक स्वप्नील कुंजीर पाटिल हे त्यांच्या गावातीलच व हवेली तालुक्यातील तसेच जिल्ह्या बाहेरील अशा शेकडो लोकांसाठी २४ तास उपलब्ध राहून मदत करीत आहे.

सकाळी उठल्या पासुन दिवसभर कोरोना ग्रस्त व अडचणी तील लोकांना मदतीसाठी जाणारा एकमेव व्यक्ति म्हणून कुंजीर यांचे नाव सम्पूर्ण हवेली तालुक्यात चर्चेचा विषय झाले आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यांपासुन लॉकडाउन सुरु झाला आहे. तेव्हा पासुन ते आज रोजी पर्यंतच्या काळात कोरोना मुळे अडचणीत असलेल्या प्रत्येकाच्या मदतीला हे कुंजीर व त्यांचे कुटुंबिय धावुन जात आहे.

त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषयीची भीती लोकांच्या मनातून काढण्याविषयी जनजागृति करणे असो किंव्हा कोरोना झालेल्या पेशंट ला भेटून धीर देण्यापर्यंत तसेच कोरोना झालेल्या व्यक्तीला उपचार मिळवून देण्यापर्यंतचे सर्व काम कुंजीर करत असल्याने सम्पूर्ण तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.

त्याचेच प्रतीक म्हणून त्यांना अनेक सामाजिक संस्था कडून कोरोना योद्धाचे पुरस्कार ही प्रदान करण्यात आले आहेत. कोरोना लॉकडाउन काळात आतापर्यंत सुमारे दीड दोन हजार कुटुंबाना किरणा धान्य व भाजीपाला कुंजीर यांच्या वतीने मोफत वाटन्यात आला आहे. कोरोना आजरातून बरे होऊन आलेल्या रुग्णसही त्यांनी फुलांचा गुच्छा देऊन त्यांचे स्वागत करतात असे स्वप्नील कुंजीर पाटील यांनी ‘न्यूज अनकट’ शी बोलताना सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा