शिवसेनेकडून 12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय

10

मुंबई, 24 जून 2022: शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित नसलेल्या 12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितलं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. ज्यासाठी व्हीप जारी करण्यात आला होता. असं असतानाही त्यांचे काही आमदार बैठकीला उपस्थित नव्हते. या नोटिशीला काही आमदारांनी उत्तर दिलं. त्यांच्या उत्तरावरून त्यांनी खोटं कारण दिल्याचं दिसतं. त्यामुळंच त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय पक्षाने घेतलाय. आम्ही उपसभापतींना निवेदन दिलं असून त्यात 12 आमदारांची नावं आहेत.

कोणाची आमदारकी रद्द करण्याची मागणी?

एकनाथ शिंदे (कोपरी)

तानाजी सावंत (भूम-परंडा)

संदीपान भुमरे (औरंगाबाद शहर)

संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)

अब्दुल सत्तार (सिल्लोड)

भरत गोगावले (महाड)

प्रकाश सुर्वे (मागाठाणे)

अनिल बाबर (सांगली)

बालाजी किनीकर (अंबरनाथ)

यामिनी जाधव (भायखळा)

लता सोनावणे (चोपडा)

महेश शिंदे (कोरेगाव)

“…असल्या धमक्यांना भीक घालत नाही” – एकनाथ शिंदे

“कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो. घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत,” असं त्यांनी म्हटलं आहे. “12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत,” असंही ते म्हणाले.

आम्ही कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्याबळ नसताना अवैध गट तयार केला म्हणून आम्हीच तुमच्यावर कारवाईची मागणी करतो, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा