मुंबई २० मार्च २०२२ : इतके दिवस प्रकृती कारणामुळे घरात बसलेले मुख्यमंत्री आता अँक्शन मोडमध्ये आले आहेत. बाहेर पडल्या पडल्या त्यांनी भाजपवर निशाणा साधला.भाजपचे हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी म्हणत त्यांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मी लवकरच राज्याच्या कानाकोप-यात जाऊन लोकांना भेटणार आहे, असं म्हणणा-या मुख्यमंत्र्यांना राज्यातला पराभव चांगलाच जिव्हारी लागला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. काल पर्यंत एमएयमने दिलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री काय म्हणतात, याकडे लक्ष लागले होते. पण आज त्यांनी प्रसत्वा धुडकावला. यावरुन खरंच आता अँक्शन मोड अँक्टिव्ह झाला, हे मात्र खरं. त्याचबरोबर संजय राऊतही आता
दो-यावर जाणार असून पराभवाची मेख सगळ्यांना बोचते आहे. संजय राऊतांनी तर थेट भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरलाच धडक देणार असल्याचं सांगितलं. २२ ते २४ दरम्यान संजय राऊत नागपूर दौरा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पण नेहमी प्रमाणे शांत बसतील ते संजय राऊत कसले.
एमआयएमची शिवेसेनेला दिलेली ऑफर, प्रस्ताव ही भाजपची नवी खेळी असल्याचं गरळ राऊंतानी ओकलंय. पुन्हा एकदा भाजपला टीकेची संधी दिली आहे. यात खरं किती खोटं किती, हे त्यांनाचा ठाऊक. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तडजोड करणार नाही, त्यामुळे आता प्रस्ताव नाकारुन आम्ही भाजपचा कट उधळला, असंही राऊत यांनी नुकतचं नमूद केलं. पण त्यामुळेच आता वादाला तोंड लागलयं. आम्ही अस्पृश्य का… असं म्हणत इम्तियाज जलील यांनी प्रश्नचिन्ह उभे केल, तर रावसाहेब दानवे यांनी मध्येच मुस्लिमांचा दोष नाही, असं म्हणत सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला. जलील आता शरद पवारांना भेटणार असून त्यांना घेऊन ते गरज पडली तर मुख्यमंत्र्यांना भेटतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. आता मुख्यमंत्री नकाराच्या निर्णयावर ठाम राहतील का? शऱद पवारांच्या सांगण्यावरुन एमआयएमशी संगनमत करतील का? या सगळ्याची उत्तरे आता काळच ठरवेल…
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस