शिवसेना पक्षप्रमुख -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे IN ACTION NOW

11

मुंबई, 5 जुलै 2022: शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री आता ॲक्शन मोडमध्ये आले असल्याचं दिसतय. मुंबई महापालिका निवडणुका आता लवकरच जाहीर होतील. त्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे पूर्णपणे कार्यरत झाले आहेत. आता शिवसेना महिला आघाडी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहे. आज उद्घव ठाकरे या सर्वांशी ॲानलाईन चर्चा करणार आहेत.

याआधी उद्धव ठाकरेंनी या संदर्भात आधीच वक्तव्य केलं आहे. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा. भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. त्यानुसार आता उद्घव ठाकरे जनसामांन्यांच्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात करत आहे. कदाचित हे पालिका निवडणुका आधीचं सत्र सुरु आहे. त्यामुळं आता उद्धव ठाकरे यांनी पाऊल नाही उचललं, तर ते त्यांना आणि तथाकथित शिवसेनेला नक्कीच घातक ठरेल.

त्यामुळं आता शिवसेनेची पालिका निवडणुकीसाठी काय रणनीती असेल आणि ठाकरे पटावर काय डाव मांडतील हे पाहणं खूप गरजेचं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस