पुणे २१ जून, २०२२ : विधान परिषदेचा निकाल भाजपच्या बाजूने लागला आणि शिवसेनेतली खदखद बाहेर आली. एकनाथ शिंदे नाराज आहे, हे आधीच स्पष्ट झालं होतं. पण आता एकनाथ शिंदेच् तडकाफडकी निघून गेलेआणि त्यांच्याबरोबर तब्बल ३५ आमदार त्यांच्याबरोबर आहेत. हे सगळे नाराज असून त्यांनी अनौपचारिक रित्या आपण कॅांग्रेस, राष्ट्रवादीबरोबर काम करण्यास नाराज असल्याचं स्पष्ट आहे. हे केवळ सूरतला बंड केलेल्या आमदारांच्या मनात नाही, तर शिवसेनेत काही काम करणाऱ्या नेत्यांच्या मनातही हेच आहे. त्यामुळे आता वर्षावर होणाऱ्या बैठकीत हे नेते मन मोकळं करणार असंही सूत्रांकडून कळत आहे. हे नेते किती आणि कुठे यावर संभ्रम सुरु आहे.
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचले. जे पी नड्डा यांच्या घरी अमित शहा पोहोचले असून फडणवीस तिथे पोहोचण्याची शक्यता आहे. पण पुन्हा एकदा संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना सात स्तरांची सुरक्षा दिली आणि सगळ्यांना गुजरात मध्ये का नेलं असं म्हणत भाजपवर अर्थात केंद्र सरकारवर निशाणा साधला. कितीही झाले तरी आरोप करणे राऊत सोडणार नाही, हे त्यांनी पुन्हा दाखवून दिलं. तर शिवसेनेचं वाईट केवळ संजय राऊतांमुळे होते, असं प्रत्तुतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
पण या सगळ्यांचा परिणाम आता काय होतो , हे पहावं लागेल. सरकार काय निर्णय घेणार हे तितकेच महत्वाचं ठरेल आणि नवी खेळी समजेल .
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस