अजित पवारांच्या आदेशाला धुडकाऊन खेड पंचायत समिती इमारतीच्या कामाला शिवसेनेकडुन सुरुवात

4

राजगुरुनगर, दि. ११ जुलै २०२०: खेड पंचायत समिती नवीन इमारत जागेवरुन मागील सहा महिन्यांपासुन शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेस आमने-सामने येऊन लढत आहे. दरम्यानच्या काळात जागेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खेड पंचायत समिती परिसरात पहाणी करुन नियोजित जागेवर पंचायत समितीचे काम न करण्याचे आदेश दिले होते. मात्र आज सायंकाळी पंचायत समितीतील नियोजित जागेवरील परवानगी घेऊन १९ झाडे तोडण्यात आली असुन लवकरच ता जागेवर पंचायत समितीची इमारत उभी रहाणार असल्याचे तालुकाध्यक्ष रामदास धनवटे यांनी सांगितले.

राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खेड तालुक्यात पंचायत समितीच्या नव्याने उभ्या    रहाणा-या इमारतीवरुन टोकाचे मेतभेद निर्माण झाले आहे. त्यातुन आज शिवसेनेच्या पदाधिकारी व पंचायत समिती सदस्य यांनी आज एकत्रीत येऊन नुतन इमारतीच्या जागेवर असणाऱ्या १९ झाडांना कात्री लावत घोषणाबाजी केली. त्यामुळे हि घोषणाबाजी म्हणजे राष्ट्रवादी कॉग्रेसला शह च होता असे चित्र पहायला मिळत होते.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी वरपे, तालुकाध्यक्ष रामदास धनवटे, महिला आघाडी अध्यक्ष विजया शिंदे उर्मिला सांडभोर, पंचायत समिती उपसभापती ज्योती अरगडे, सदस्य भगवान पोखरकर, वैशाली जाधव उपस्थितीत होते. खेड पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. माजी आमदार व माजी खासदार यांच्या प्रयत्नातुन खेड पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे उद्धाटन विधानसभा निवडणुकीपुर्वी करण्यात आले होते. मात्र वर्षभराचा कालावधी उलटुन गेला. तरीसुद्धा पंचायत समितीच्या कामाला सुरुवात झाली नाही. मात्र काल अचानक शिवसेना पदाधिकारी व पंचायत समिती सदस्यांचा मार्चा पंचायत समितीवर आला व नुतन इमारतीच्या जागेवर असणाऱ्या १९ झाडांची तोडणी करण्याची परवानगी मिळाल्याने झाडांना कात्री लावण्यात आली आहे.

आज पंचायत समितीच्या नवीन इमारतीवरून सुरु झालेल्या वादात शिवसेनेने पुन्हा एकदा रणसिंग फुंकले असल्याने विरोध करणा-या राष्ट्रवादी कॉग्रेस पुढील काळात काय भुमिका घेणार हे पुढील काळात पहावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुनिल थिगळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा