थंड हवेच्या लोणावळ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे लोणावळ्यात आगामी निवडणुकीत युती किंवा आघाडी होण्याची शक्यता जवळजवळ मावळली असून, सर्वच पक्ष आता एकट्याने निवडणूक लढवण्याच्या तयारीत दिसत आहेत.
शिवसेना पुणे जिल्हा सहसंघटक शादान चौधरी, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब फाटक, मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, लोणावळा शहर प्रमुख परेश बडेकर आणि शाम सुतार यांच्या हस्ते या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. दुसरी यादी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह लवकरच म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसांत प्रसिद्ध केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
पर्यटननगरी लोणावळ्यात ही निवडणूक केवळ स्थानिक न राहता, तिचे महत्त्व वाढले आहे. शहर विकास आणि मूलभूत सुविधांच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाईल. मूलभूत सुविधा, पर्यटन विकास, वाढती वाहतूक कोंडी आणि कचरा व्यवस्थापन हेच या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे ठरणार आहेत.
प्रभागनिहाय उबाठा गटाचे उमेदवार (पहिली यादी)
- प्रभाग १: सना राजूभाई चौधरी (साळुंखे) आणि धनंजय विष्णुपंत साळुंखे
- प्रभाग ४: रामभाऊ थरकुडे
- प्रभाग ५: उल्हास चंद्रकांत भांगरे
- प्रभाग ११: कविता विजय बैकर आणि परेश परशुराम बेडेकर
- प्रभाग १२: अनिल बबन कडू
- प्रभाग १३: माणिक मोतीराम मराठे आणि विजया दिलीप गायकवाड
शिवसेना (उबाठा) गटाच्या या घोषणेमुळे लोणावळ्यातील रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे














































