खालापूर, रायगड ७ जानेवारी २०२४ : मराठी भाषेचे आद्य पत्रकार आणि दर्पण या मराठी मधील पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने पत्रकार दिनांचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि माजी महापौर स्व.भिकू वाघेरे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून खालापूर, कर्जत,पनवेल, उरण या तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. यावेळी सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आले.
नुकताच राष्ट्रवादीतुन उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेल्या संजोग वाघेरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यांची नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभा संघटक पदी नियुक्ती केली असून मावळ लोकसभा मतदार संघात शिसवेनेचा भगवा फडकविण्याची जबाबदारी वाघेरे यांच्यावर दिली आहे. शिवसेना संघटक संजोग वाघेरे यांनी ६ विधानसभा मतदार संघात शिवसेनेची पक्ष संघटना बांधणी साठी जोरदार प्रयत्न केले असून येणाऱ्या काळात मावळ मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि स्व.भिकू वाघेरे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधत कर्जत, खालापूर, उरण, पनवेल या चारही तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे, शिवसेना नेते श्यामभाई साळवी, आदमी पार्टी शेखर जांभळे, पंकज रुपवते, नगरसेवक -नितीन मोरे, संपर्क प्रमुख पनवेल वैभव सावंत, मावळ संपर्क प्रमुख- प्रभाकर पवार, विकास चालके, पनवेल तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, पनवेल तालुका प्रमुख संदीप तांडेल, युवा सेना कर्जत प्रथमेश मोरे, संतोष देशमुख खोपोली तालुका प्रमुख, मा.सरपंच वानिवली सुनील थोरवे आदींसह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : दत्तात्रय शेडगे