कन्नड, छत्रपती संभाजीनगर ९ नोव्हेंबर २०२३ : कन्नड तालुक्यातील शिंदे गटाचे शिवसेना युवा तालुकाध्यक्ष राहुल वळवळे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मोटार सायकलला बैलगाडीने समोरासमोर धडक दिल्याने ते गंभिर जखमी झाले होते. रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने तालुक्यातून व करंजखेड या त्यांच्या गावातून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यात केतन काजे, माझी आमदार नितीन पाटील, उदयसिंग राजपूत यांच्या सहकार्याने तालुक्याचं प्रभावी नेतृत्व करणारा जन सामान्यातला माणूस, समाजसेवा करणारे व्यक्तिमत्त्व अशी ओळख प्राप्त करणारे राहुल वळवळे यांच्या जाण्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.
वयाच्या अवघ्या कमी वयात राजकारण क्षेत्रातील मोठे नाव असलेले राहुल वळवळे त्यांच्या जाण्याने करंज खेड गावातूनच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात शोकाकुल वातावरण पसरले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा आठ वर्षाचा मोठा मुलगा, लहान मुलगा अवघ्या १३ महिन्याचा आणि पत्नी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. करंजखेड सिल्लोड या रोडवर झालेला या अपघातात टांगा गाड्याच्या शर्यतीची प्रॅक्टिस म्हणून त्या मुख्य रस्त्यावरती पळविल्या जात होत्या. अंधाऱ्या रात्री समोरून येणाऱ्या टांगा गाडी ने राहुल वळवले यांच्या गाडीला धडक दिली. या धडकेमध्ये त्यांच्या छातीवरती व तसेच हाताला लागल्याचे प्रथमदर्शीनीं सांगितले. तेथून त्यांना लागलीच सिल्लोड येथे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
त्यानंतर सिरीयस झाल्यामुळे काल त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात आणले गेले, परंतु ९.30 च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. आज त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी करंजखेड येथे करण्यात आला. यावेळी असंख्य लोकांची गर्दी जमा झाली होती. त्यांना करंजखेड येथील स्मशानभूमी मध्ये शेवटचा निरोप देण्यात आला..
न्यूज अनकट प्रतिनिधी : रविंद्र खरात