इंधनवाढीच्या विरोधात शिवसेनेचे दुचाकी, रिक्षा ओढत आंदोलन

बारामती, ५ फेब्रुवरी २०२१: केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल,व डिझेल इंधन दर वाढीच्या विरोधात बारामती तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने शुक्रवार (दि.५) भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभाजवळ दुचाकी व रिक्षाला दोर बांधुन वाहने ओढुन अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विभागीय नेते संजय रावसाहेब, विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर व संपर्कप्रमुख सत्यवान दुबे यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हा प्रमुख ऍड. राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वात बारामती तालुका शिवसेनेच्या वतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रतीकात्मक आंदोलन म्हणून दुचाकीला दोरी बांधून ओढत शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंधन दरवाढ सर्वसामान्य लोकांना परवडणारी नसुन त्याचा अधिभार सामान्य लोकांवर पडत आहे. कोरोना संसर्गामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. इंधन दरवाढीमुळे व्यावसायिक मंदी निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करण्याची मागणी केली.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पिंगळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विश्वास मांढरे, शहर प्रमुख पप्पू माने, तसेच विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलेश मदने, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुदाम गायकवाड, विभाग प्रमुख दत्ता लोणकर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा