पुरंदरला ३३ ग्रामापचातीच्या सरपंच निवडीत शिवसेनेची बाजी, १५ ठिकाणी सेनेची आघाडी

पुरंदर ९  फेब्रुवारी २०२१ : पुरंदर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीचे कारभारी आज निवडण्यात आले. अपेक्षेप्रमाणे यात शिवसेनेने बाजी मारली. जवळपास १५ गावांमध्ये शिवसेनेच्या विचारांचे सरपंच पदारूढ झाले आहेत. कॉंग्रेसला दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळाले तर राष्ट्रवादी आणि भाजप अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.
भिवडी येथे तात्या भिंताडे यांच्या नेतृत्वाखालील उमाजी नाईक आघाडीने विजय मिळवला होता. या आघाडीने सरपंचपदी श्वेता चव्हाण आणि उपसरपंचपदी राहुल मोकाशी या सेनेच्या कार्यकर्त्यांना संधी दिली. परिंचे येथे शिवसेनेच्या सभापती अर्चना जाधव यांच्या पॅनेलने विरोधकांना अस्मान दाखवले होते. इथे सरपंचपदी ऋतुजा जाधव तर उपसरपंचपदी दत्तात्रय राऊत यांना संधी देण्यात आली. ऋतुजा या भाजपच्या पदाधिकारीदेखील आहेत. भिवरी येथे सरपंचपदी संजय कटके तर उपसरपंचपदी प्रणोती कटके यांची निवड झाली. चांबळीच्या सरपंचपदी प्रतिभा कदम तर उपसरपंच म्हणून संजय कामठे यांची वर्णी लागली. बेलसरला सेनेचे गणप्रमुख धीरज जगताप यांच्या पॅनेलने अभूतपूर्व यश मिळवले होते. तिथे सरपंचपदी अर्जुन धेंडे तर उपसरपंचपदी स्वतः धीरज जगताप बिनविरोध निवडून आले. पिसर्वे गावात सेनेला मोठे यश मिळाले होते. इथे बाळासाहेब कोलते सरपंच तर अरुणा कोलते या उपसरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख पोपटराव खेंगरे यांच्या नेतृत्वाखाली तक्रारवाडीत शिवसेना राष्ट्रवादीने गाव बिनविरोध केले. इथे बाबासाहेब खेंगरे हे सरपंच तर बाबासो पिलाणे हे उपसरपंच झाले. टेकवडी गावात सेनेच्या रत्नाबाई इंदलकर सरपंच तर कॉंग्रेसचे बंडखोर सुरज गदादे हे उपसरपंचपदी निवडून आले. गुरोळी गावात माजी सभापती रमेश जाधव आणि सेनेचे उपतालुकाप्रमुख महादेव शिंगाडे यांनी रामगुरुजी खेडेकर यांची अनेक वर्षाची सद्दी मोडून काढत सत्ता मिळवली. सरपंचपदी उज्वला जाधव आणि उपसरपंचपदी मधुकाका खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
हरगुडे गावात विजय शिवतारे यांचे निकटवर्तीय भूषण ताकवले यांनी वर्चस्व राखत सरपंचपद पटकावले तर उपसरपंचपदी अविनाश जाधव यांची निवड झाली. माहूरला शिवसेना कॉंग्रेस युतीने हेमंतकुमार माहुरकर आणि शरद जगताप यांच्या पॅनेलला पराभूत करत सत्ता मिळवली. इथे सेनेचे उपशाखाप्रमुख रामदास जगताप सरपंचपदी तर उपसरपंचपदी पूनम माहुरकर या निवडून आल्या.  हरणी गावात शिवसेनेचे धनाजी यादव सरपंच तर प्राजक्ता यादव या उपसरपंचपदावर आरूढ झाल्या. केतकावळे या सेनेच्या पारंपारिक बालेकिल्ल्यात मा. सरपंच सतीश बाठे आणि मारुती भाडळे यांनी पुन्हा एकदा कमाल दाखवली. इथे मारुती भाडळे सरपंच तर आनंदा गोरे हे उपसरपंच झाले. सुपे खुर्द गावात काट्याची टक्कर झाली त्यात सेनेने बाजी मारत सरपंचपदी अनिता जाधव आणि उपसरपंचपदी संतोष जगताप यांची निवड केली. जेऊर गावामध्ये निवडणूक बिनविरोध झाली होती. सरपंच आणि उपसरपंचपदी अनुक्रमे स्वाती शिरसट आणि माऊली धुमाळ यांची निवड झाली.
गराडे या मोठ्या ग्रामपंचायतीत गंगाराम जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपने यश मिळवले. सरपंचपदी नवनाथ गायकवाड तर उपसरपंचपदी नितीन जगदाळे यांची निवड झाली. पिंपळे गावात राष्ट्रवादी सेना युतीने बाजी मारली. सरपंचपदी मीनाक्षी पोमण तर उपसरपंचपदी किरण खेनट यांची निवड झाली. राष्ट्रवादीला राजेवाडी, नीरा, कोडीत खुर्द, निळूंज, पांडेश्वर, पिंपळे आदी सहा गावात सरपंच बसवण्यात यश आले तर कॉंग्रेसने तोंडल, सोमुर्डी, खानवडी, रीसे, नाझरे सुपे, पूरपोखर, शिवरी आदी सहा गावात सरपंच पद मिळाले. भाजपने दिवे आणि झेंडेवाडी येथे स्वबळावर सरपंचपद पटकावली. मावडी क.प सेनेचे बहुमत असले तरी येथे स्थानिक आघाडीद्वारे सोनाली चाचर सरपंच तर सुवर्णा तोरवे उपसरपंच बनल्या आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी :-  राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा