शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण; राजकोट किल्ल्यावर ६० फूट उंच शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण.

36
शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण! राजकोट किल्ल्यावर ६० फूट उंच शिवछत्रपतींच्या मूर्तीचे अनावरण!
६० फूट उंच शिवछत्रपतींच्या मूर्तीचे अनावरण!

Shiva Chhatrapati unveiling Rajkot Fort: राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची नवी ६० फूट उंचीची भव्य मूर्ती उभारण्यात आली असून, तिच्या अनावरणाचा सोहळा ११ मे २०२५ रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. या ऐतिहासिक क्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनेक मान्यवर नेते, मंत्री उपस्थित होते.

शिवछत्रपतींचे शिवस्मारक – ११ मे हा ऐतिहासिक दिवस

जुन्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याची दुर्घटना
जुन्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याची दुर्घटना

जुन्या पुतळ्याचे दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) नव्या मूर्तीसाठी २४ कोटी रुपयांचा निधी खर्च केला. पुतळ्याचे डिझाइन, बांधकाम, उभारणी आणि देखभाल यासाठी IIT-बॉम्बेच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आले असून या पुतळ्याला १०० वर्षांची हमी देण्यात आली. पुढील १० वर्षे ठेकेदाराकडून पुतळ्याची देखभाल केली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रकल्पासाठी तज्ज्ञ शिल्पकार, नौदल अधिकारी, सिव्हिल इंजिनिअर्स आणि कला संचालनालय यांच्या देखरेखीखाली काम करण्यात आले. पुतळ्याचे सुरुवातीचे मॉडेल फायबरमध्ये तयार करण्यात आले होते आणि कला संचालनालयाकडून मंजुरीनंतरच अंतिम पुतळ्याचे बांधकाम मुदतीत पूर्ण सुद्धा झाले. राजकोट किल्ला कोकणातील ऐतिहासिक वारसा असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेली ही भव्य पुतळ्याचे स्थानिकांसह सर्व शिवप्रेमींसाठी अभिमानाचा विषय ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी,राजश्री भोसले