सूर्यग्रहण लाईव्ह अपडेट (झारखंड)

वर्षाच्या सर्वात मोठ्या दिवशी, आज, २१ जून रोजी, सूर्यग्रहण सुरू झाले आहे. २५ वर्षांनंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एखाद्या अंगठी सारखे दिसणारे ग्रहण सुरू झाले आहे. सूर्य ग्रहण दरम्यान पूर्ण भारतामध्ये सूर्य एका वर्तुळाकार अंगठी प्रमाणे दिसेल. यादरम्यान सूर्याचा मध्यभाग पुर्ण अंधाराने व्यापलेला असेल व बाजूने थोडा थोडा प्रकाश बाहेर येत राहील. त्या वर्तुळाच्या एका बाजूने सूर्य पुन्हा समोर येण्यास सुरुवात होईल तिथे एक मोठा ठिपका दिसेल जो अंगठी मध्ये असलेल्या हिऱ्या प्रमाणेच चमकताना दिसेल. यापूर्वी १९९५ मध्ये असे ग्रहण पाहिले गेले होते. सूर्यग्रहण सकाळी ९.१५ वाजता सुरू होईल आणि दुपारी ३.०४ वाजता पूर्ण होईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा