शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम लवकर मार्गी: अजित पवार

पुणे: शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगी-शेवाळवाडी मेट्रोसाठी भूमिसंपादन मार्गिका क्र.३ चे काम लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. या मार्गासाठी राज्य शासनाच्या मालकीची सुमारे १५ हजार चौ. मी. जागा आवश्यक आहे. त्या जमिनी देण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगितले.

पीएमआरडीएच्या कामकाजाचा पवारांनी मंत्रालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे तसेच पुणे जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुणे शहर तसेच जिल्ह्यातून जलद पोहोचता येईल, अशा पद्धतीने रस्त्यांचे नियोजन विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रस्तावित शिवाजीनगर -हडपसर- फुरसुंगी – शेवाळवाडी मेट्रोसाठी भूमिसंपादन; तसेच अन्य बाबी लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
पीएमआरडीच्या प्रकल्पांसाठीचे आर्थिक नियोजन, मनुष्यबळ, उत्पन्नाचे स्रोत, रिंगरोड, रस्ते, मेट्रो मार्गिका, प्रधानमंत्री अवास योजनेंतर्गत परवडणार्‍या घरांचे प्रकल्प, नगररचना योजना, टाऊनशिप, इंद्रायणी नदीसुधार, प्राधिकरणाच्या हद्दीत पाणीपुरवठा आदी बाबींचा सविस्तर आढावा पवार यांनी घेतला. या बैठकीस पीएमआरडीएचे आयुक्‍त विक्रम कुमार, मुख्य नियोजनकार विवेक खरवडकर, अतिरिक्‍त आयुक्‍त प्रवीणकुमार देवरे आदी अधिकारी उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा