रायगडच्या धर्तीवर प्रतापगड विकास प्राधिकरण ; पाचाड शिवसृष्टीसाठी ५० कोटी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

रायगड, २ जून २०२३: मागील पाच वर्षांपूर्वी तत्कालीन युती शासनाने घोषित केल्याप्रमाणे किल्ले रायगड प्रमाणेच आता प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याची घोषणा आज किल्ले रायगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खासदार उदयनराजे भोसले असतील. त्याचप्रमाणे किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे शिवसृष्टी निर्मितीसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी यावेळी जाहीर केले आहे.

३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर कान्होजी जेधे यांचे वंशज, जगतगुरु तुकाराम महाराज यांचे वंशज मोरे, महाराज गुरुवर्य धायरेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज खासदार उदयनराजे भोसले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन, दीपक केसरकर, हे आवर्जून उपस्थित होते.

यांच्यासह आमदार बच्चू कडू, आ. प्रकाश सुर्वे, आ. भरतशेठ गोगावले, आ. रविंद्र पाटील, आ. महेंद्र थोरवे, आ. प्रवीण दरेकर, आ. प्रशांत ठाकूर, आ. अनिकेत तटकरे, खासदार श्रीकांत शिंदे, खा. श्रीरंग बारणे, खा. सुनील तटकरे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा