शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही: छगन भुजबळ

मुंबई : २६ जानेवारीला सुरु होणारे ‘शिवभोजन’ हे गरीब व गरजू व्यक्तीसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती केली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

याबाबत भुजबळ म्हणाले की, या योजनेअंतर्गत प्रारंभी प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्याचे मुख्यालय व महानगरपालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरु होणार आहे.
भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असून सदर भोजनालये दु. १२ ते २ या वेळेत सुरु राहतील. या भोजनालयात सदर वेळेत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भोजनालय चालकाची राहील.
भोजनालयासाठी चालकाकडे स्वत:ची जागा असावी. भोजनालयात एका वेळी किमान २५ जणांच्या जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असावी. भोजनालयात किमान ७५ तर कमाल १५० थाळी जेवण मिळणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा