शिवधर्म फाऊंडेशनच्या लढ्याला अखेर यश

बारामती, २१ जानेवारी २०२१: छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या नावाने मागील ८८ वर्षापासून सुरू असलेल्या संभाजी बिडी या नावाला शिवधर्म फाऊंडेशनने जोरदार विरोध करत आमरण उपोषण केले होते. याची दखल घेत कंपनीने संभाजी बिडीचे नामांतर करत साबळे बिडी असे केल्याने शिवधर्म फाऊंडेशनने दिलेल्या लढ्याला यश आले असल्याचे अध्यक्ष दीपक काटे यांनी सांगितले.

छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या नावाने मागील ८८ वर्षापासून सुरू असणाऱ्या संभाजीबिडी नावामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असुन त्यांची विटंबना होत असल्याने शिवधर्म फाऊंडेशनच्या वतीने मागील वर्षी दि.४/९/२०२० रोजी किल्ले पुरंदर येथे आमरण उपोषण करण्यात आले होते. याप्रकरणी पोलीसांनी साबळे वाघीरे कंपनीवर गुन्हा दाखल केल्यावर शिवधर्म फाउंडेशनने उपोषण मागे घेण्यात आले होते.

फाऊंडेशनने दिलेल्या या सातत्यपूर्ण लढयाला आज यश आले असून, साबळे आणि वाघीरे कंपनी यांनी पत्रकार परिषदेत संभाजी बिडीचे नांव बदलून आता साबळे बिडी असे करण्यात आले असल्याचे सांगितले तसेच फाउंडेशन यांना तसे पत्र दिले आहे. याविषयी अध्यक्ष दिपक काटे यांनी हे यश महाराष्ट्रातील तमाम शिवशंभो भक्तांचे असून, पुढे देखील शिवधर्म फाऊंडेशन सामाजिक कार्यात सतत सक्रीय राहणार असल्याचे काटे यांनी सांगितले. शिवधर्म फाऊंडेशनच्या या मोहिमेत दीपक काटे यांच्यासह मच्छिंद्र टिंगरे, सुनिल पालवे, रवी पडवळ, दिनेश ढगे व सागर पोमण सहभागी होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा