शिवसेनेला लागली लॉटरी? पाच वर्ष मिळणार मुख्यमंत्री पद

मुंबई : राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या समन्वय समितीत किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे. त्यातच सत्तावाटपाचाही फॉर्म्युलाही ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार आहे. अशी माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळत आहे.
या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद राहील, असे निश्चित झाले आहे. तसेच मंत्रिपदांच्या वाटपाबाबतचेही धोरण निश्चित झाले आहे. त्यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी १४ तर काँग्रेसच्या वाट्याला १२ मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे.

याबाबत सूत्रांनी माहिती दिली की, महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहेत. तसेच तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही एकमत झाले आहे. किमान समान कार्यक्रमामधील करारानुसार शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १४ मंत्रिपदे मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १४आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदे मिळतील.

याबाबत शरद पवार हे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार आहे. त्यातच उद्धव ठाकरेही सोनिया गांधी यांची सदिच्छा भेट घेणार आहे. अशीही चर्चा रंगू लागली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा