भारतीय संघाला झटका, के एल राहुल सीरिज मधून बाहेर

मेलबर्न, ५ जानेवारी २०२१: भारतीय संघाला पुढील दोन सामन्यांन बाबत एक धक्का बसला आहे. भारताचा अनुभवी शिलेदार लोकेश राहुल याला नेटमध्ये सराव करत असताना डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे राहुल ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उरलेल्या दोन टेस्ट सामन्यांमधून माघार घ्यावी लागणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील तिसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सिडनी मध्ये सुरुवात होत आहे. या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मा सज्जा आहे. त्यामुळे सिडनी कसोटीत रोहित शर्मा खेळणार हे निश्चित झाला आहे.

शनिवारी मेलबर्नमध्ये नेटमध्ये सराव करत असताना राहुलच्या डाव्या हाताला दुखापत झाली. दुखापत गंभीर असल्याने त्याला बरे होण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ लागेल असे सांगण्यात येत आहे. राहुल आता भारतामध्ये परतणार आहे व बेंगलोर मध्ये उपचार घेईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील टेस्ट सिरीज मधील तिसरा सामना ७ जानेवारी रोजी सिडनीमध्ये होणार आहे तर चौथा आणि शेवटचा सामना १५ जानेवारी रोजी होईल. के एल राहुल ला एडिलेड आणि मेलबर्न सामन्यांमध्ये खेळण्यासाठी संधी मिळाली नव्हती. सध्या ही सिरीज १-१ ने बरोबरीत आहे.

अशी अपेक्षा होती की, के एल राहुल ला हनुमा बिहारी च्या ऐवजी सिडनी मध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये जागा दिली जाईल. हनुमा बिहारी च्या बाबतीत बोलायचे झाले तर मागील आपल्या ३ डावांमध्ये त्याने केवळ ४५ धावा केल्या आहेत. या दुखापतीमुळे के एल राहुल फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्येही न खेळण्याची शंका आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा