धक्कादायक; फ्लॅटच्या विक्रीवरुन वाद पेटला; पतीने पत्नीचा जीव घेत स्वतःही उचललं टोकाचं पाऊल

दिल्ली, ७ सप्टेंबर २०२२: दिल्लीतील लक्ष्मीनगर येथे राहत असणाऱ्या नीरज नावाच्या व्यक्तीचा त्याच्या पत्नीसोबत फ्लॅट विकण्याच्या कारणावरुन सतत वाद व्हायचा. सदर फ्लॅट हा फ्लॅट नीरजच्या पत्नीच्या नावावरती होता. आणि तिला तो विकायचा होता. मात्र नीरजला फ्लॅट विकायचा नव्हता, यावरुन दोघांमध्ये सतत वाद व्हायचा.

मंगळवारी रात्री मोठा वाद झाला आणि याच वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. नीरजने पत्नीला चाकुने भोसकलं, या भांडणादरम्यान घरात असणाऱ्या ८आणि १२ वर्षाच्या दोन मुलांनी आईला वाचविण्याचा प्रयत्न केला असता नीरजने त्यांना देखील मारहाण केली. शिवाय या सर्व घटनेनंतर त्याने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. शेजारी राहत असणाऱ्या लोकांना काहीतरी गोंधळ सुरु असल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसांना कळवलं.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात हलवलं, रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी पत्नीला मृत घोषित केले. तर पती नीरजसह दोन्ही मुलांवरती सध्या उपचार सुरु आहेत. नीरजची प्रकृती चिंताजनक असून मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा