रायपूर, २२ फेब्रुवारी २०२३ :छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जगासमोर अवघ्या दोन दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या या प्रेमी युगुलाचे मंगळवारी रात्री रिसेप्शनच्या दिवशी बंद खोलीत मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवकाचे नाव अस्लम, तर युवतीचे नाव बेगम काहकाशा बानो असे आहे. या दोघांचे १९ फेब्रुवारी रोजी दोघांचे लग्न झाले होते, त्यानंतर दोघेही २१ फेब्रुवारीला रिसेप्शन पार्टीसाठी तयार होण्यासाठी रूममध्ये गेले. दरम्यान, दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. त्यानंतर तरुणाने आधी पत्नीवर चाकूने वार करत तिचा खून केला आणि नंतर स्वतःवर वार करून मृत्यूला कवटाळले.
या हल्ल्यात नवरी गंभीर जखमी झाली, त्यानंतर अस्लमने स्वतःवरही वार केले. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. सध्या पोलिसांनी चाकू ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.