धक्कादायक घटना…मित्रानेच मित्राच्या बायकोवर केला बलात्कार,

बीड, २९ सप्टेंबर, २०२२: बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे‌. बीड मध्ये एका मित्राने आपल्याच मित्राच्या बायकोवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. बीडच्या धारुर तालुक्यातल्या एका गावात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पिडीत महिला असोला येथील रस्त्याने पायी जात असताना, पतीचा मित्र आरोपी सचिन वाव्हळ हा चारचाकी गाडी घेऊन आला. वहिनी, मी तुम्हाला इच्छित ठिकाणी सोडतो, असे म्हणत त्याने जबरदस्तीने त्या महिलेला गाडीत बसवले आणि नंतर आरोपीने गाडी बांगरवाडी परिसरात नेली.

आरोपीने महिलेचा गळ्यात हात टाकून फोटो काढले आणि हे फोटो फेसबुकवर व्हायरल करतो, अशी धमकी देत महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा पिडीत महिलेला जबर धक्का बसला.

महिलेने झालेली सर्व हकीकत आपल्या पतीला सांगितली. मित्रानेच घात केल्याचा पतीला खूप राग आला. पण पतीने थेट पोलिस स्टेशन गाठले. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपी विरोधात धारुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. देशभरासह राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

महिला अत्याचार विरोधी कायदा अंमलात आणावा, अशी मागणी होत आहे. बीडच्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई पोलिस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा