पुणे, ९ सप्टेंबर २०२०: कोरोना मुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त आहे. त्यात भारत दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात प्रभावित देश ठरला. मात्र अशा परिस्थितीत देखील एक दिलासादायक बाब म्हणजे ऑक्सफर्ड आणि ‘ॲस्ट्राझेनेका’ यांनी तयार केलेल्या कोरोनावरील लसीला देखील ग्रहण लागल्याचं दिसत आहे. ऑक्सफर्ड आणि ‘ॲस्ट्राझेनेका’ यांनी तयार केलेल्या कोरोनावरील लसीला आता झटका बसला आहे. ही लस तिच्या मानवी चाचणीच्या टप्प्यात होती. ‘एस्ट्राजेनेका’ आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस (Oxford covid-19 Vaccine) च्या मानवी चाचणीत सामील असलेला एक व्यक्ती आजारी पडला आहे. त्यामुळे या लसीची चाचणी थांबवली आहे.
पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये कोव्हिड १९ लशीची चाचणी आणि उत्पादन केले जात होते. पुण्यातील पाच जणांपासून ही मानवी चाचणी सुरु झाली. त्यापैकी तिघा जणांमध्ये अँटीबॉडी दिसल्याने ते बाद ठरले, तर दोघांना वैद्यकीय त्रास सुरु झाले. कोव्हिड १९ वर लस तयार करण्याच्या शर्यतीत अग्रणी असलेल्या ‘अॅस्ट्राझेनेका’च्या प्रवक्त्यांनी एका निवेदनात म्हटले, की कंपनीच्या आढावा प्रक्रियेत लसीकरण संशोधनाला विराम देऊन सुरक्षेबाबत पुन्हा आढावा घेण्याचे ठरले.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, अशा मोठ्या चाचणीत व्यक्ती आजारी पडण्याची सर्व शक्यता आहे, तरी सुध्दा आजारी व्यक्तीची स्वतंत्र तपासणी करणे फार महत्वाचे आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठात कोरोना व्हायरस लसीची चाचणी थांबविण्याची ही दुसरी वेळ आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे