धक्कादायक! मुलांनी रागात येऊन केला वडिलांचा खून

9

लातूर, ७ ऑक्टोबर २०२०: औसा तालुक्यातील शिंदळावाडी येथे अंगावर शहारे आणणारा प्रकार समोर आला आहे. वडील सतत दारू पिऊन आईला मारहाण करतात याचा राग मनात धरून दोन्ही भावंडांनी वडिलांचा खून केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर कृष्णा मच्चींद्र गरड व त्याच्या भावावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मच्चिंद्र काशिनाथ गरड (वय ४३) यांचा मृतदेह शिंदाळ वाडी शिवारातील योगिता गरड यांच्या शेतात आढळून आला. मृतदेह आढळल्यानंतर काही वेळातच संपूर्ण गावात चर्चा सुरू झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यात आले. त्यावेळी मृत झालेल्या व्यक्तीच्या मानेवर, डोळ्यावर जखम झाल्याचे दिसून आले. यात सदर माहितीनुसार गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी मृत झालेल्या व्यक्तीच्या वडिलांनी तक्रार नोंदविली आहे. यावरून कृष्णा गरड आणि त्याच्या भावावर खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा