धक्कादायक : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

हैद्राबाद, २१ फेब्रुवारी २०२३ : हैदराबादमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे एका ४ वर्षांच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ल्या केला असून, या घटनेत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निजामाबादचा रहिवासी असलेले गंगाधर हैदराबादमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. गंगाधर आपल्या मुलाला घेऊन काम करत असलेल्या ठिकाणी घेऊन आले होते. मुलगा खेळत असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने मुलावर हल्ला चढवला.

मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून मुलाचे वडील धावत आले आणि त्यांनी त्याला कुत्र्यांपासून वाचवले आणि जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा