धक्कादायक प्रकार; पंचवीस हजार रुपयांच्या लाच प्रकरणी उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

परभणी, ११ ऑक्टोबर २०२२: परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पोलीस उपनिरीक्षकावर पंचवीस हजार रुपयांच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने संपूर्ण तक्रारीची पडताळणी केल्यानंतरच दाखल करण्यात आला आहे.

ही घटना पालम पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक नामदेव उमाजी राठोड यांच्याशी संबंधित आहे. राठोड यांच्याकडे एक मारहाणी प्रकरणाची तक्रार आली होती. त्या गुन्ह्यात तक्रारदार व त्याच्या नातेवाईकांना तपासात मदत करण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदारांनी याबाबत परभणी येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. एसीबीच्या पथकाने तक्रारीची संपूर्ण पडताळणी केली. त्यानंतर लाच लुचपत पथक सापळा रचून बसले होते.

परंतू तक्रारदार रक्कम घेऊन आला असता, त्यांने रक्कम देऊ केली. पण पोलीस उपनिरीक्षक नामदेव उमाजी राठोड यांना संशय आल्याने त्यांनी ती लाचेची रक्कम स्वीकारली नाही. दरम्यान तपासात पोलीस कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्या विरोधात पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहीती एसीबीच्या आधिकाऱ्यांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा