धक्कादायक प्रकार; कुत्र्याने मटण खाल्लं म्हणून पोटच्या मुलीवर केला गोळीबार

उस्मानाबाद, २० सप्टेंबर २०२२: उस्मानबाद जिल्ह्यातील तुळजापुर तालुक्यातील कार्ला येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी आई-वडीलांना बेड्या ठोकल्या आहेत. मृत्युमुखी झालेल्या मुलीचे काजल मनोज शिंदे आसे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काजल आपल्या माहेरी आली होती.

मुलगी आली म्हणून आईने जेवायला मटण बनवलं होतं, आई काहीतरी दुसरं काम करायला बाहेर गेली होती. जाताना काजलला लक्ष ठेव असे सांगून गेली. पण काजलचे दुर्लक्ष झाल्याने कुत्र्याने हे मटण खाल्लं, त्यानंतर काजल आणि तिच्या आईमध्ये खुप वादावादी झाली.

याच वादावादीतून रागाच्या भरात काजलचे वडील मनोज शिंदे यांनी आपल्याकडील गावठी बंदुकीने तिच्यावर गोळी झाडली. गोळी थेट काजलच्या छातीत घुसल्याने काजल गंभीरित्या जखमी झाली. तिला ताबडतोप रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखलकरण्या आधीच तिचा मृत्यु झाला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी आई-वडीलांना ताब्यात घेतले आहे. या पुढचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा