कंटेनमेंट झोनमध्ये दुकाने बंद राहणार, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली, १ डिसेंबर २०२०: कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात केंद्रीय गृह मंत्रालयाने दुकानांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंटेनमेंट झोनमध्ये दुकाने बंद राहतील. केवळ कंटेनमेंट झोनबाहेरील बाजारपेठा चालविण्यास परवानगी आहे.

जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्रीय मंत्रालयाने वृद्ध, गर्भवती महिला आणि मुलांना फक्त आवश्यक कामांसाठी घराबाहेर जाण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय सामाजिक अंतर, स्वच्छता आणि मास्क वापरण्यावर भर देण्यात आला आहे.

उच्च जोखमीच्या श्रेणीतील दुकानांना लोकांचा एकमेकांशी किमान संपर्कात येईल या पद्धतीने दुकान चालवण्यास सांगितले आहे. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी ते मार्केट ओनर असोसिएशनशी संपर्क साधतील असे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार दुकान उघडण्यापूर्वी दुकानदारांना आतल्या सर्व जागांची स्वच्छता करावी लागेल. याशिवाय दुकानाच्या त्या जागांवर वेळोवेळी स्वच्छता करण्यास सांगितले गेले आहे जे बहुतेक ग्राहकांच्या संपर्कात येत आहे.

दररोज दोन ते तीन वेळा स्वच्छतागृहे, हात धुण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याचे स्टेशन स्वच्छ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दररोज मोकळ्या जागेचे आणि लोक वापरत असलेल्या जागांचे स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना विषाणूविरूद्ध सावधगिरी बाळगण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर नजर ठेवण्यासाठी बाजार समितीने उपसमिती गठीत करण्याचेही निर्देश दिले आहेत. मार्गदर्शक सूचनांमध्ये असेही म्हटले आहे की जर मार्केट स्वत: नियम लागू करण्यास अपयशी ठरले तर पर्यायी दिवसात बाजार उघडणे किंवा बंद करणे यासारखी खबरदारी सरकार कडून घेतली जाऊ शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा