पुणे जिल्ह्यातून श्रमिक स्पेशल रेल्वे मध्य प्रदेशकडे रवाना

पुणे, दि. ८ मे २०२०: लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या निवारागृहात असलेल्या मध्य प्रदेशातील १०९३ मजुरांना घेऊन उरळी कांचन (पुणे) ते रेवा (मध्य प्रदेश) विशेष रेल्वे काल सायंकाळी रवाना झाली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्यासह रेल्वे तसेच पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पुणे जिल्हा प्रशासनाकडून या प्रवाशांसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून चोख व्यवस्था केली होती. या ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले होते.

प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही रेल्वे पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आली असून प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात येत होती. तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची देखील सोय करण्यात आली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा