लोणी काळभोर: संपूर्ण जगांत कोरोनाची थैमान घातले असून, याला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक कामगार-गोरगरीब नागरिकांचे खाण्या-पिण्याची हाल होत आहे .व त्यांच्या मदतीला श्री .चिंतामणी इंटरप्रयजेस, धाऊन आले आहे.जे कामगार अथवा निर्वासित आहेत, त्यांच्या दोन वेळ जेवणाची सोय व चहा, पाणी,केळी, द्राक्ष, कलीगड, अजून जे असेल ते असा प्रवास त्यांनी चालू केला आहे. रोज किमान ५० लोकांना मद्दत करत आहेत. सकाळी – संध्याकाळी गुळाचा चहा, लींबू टाकून व तसेच कामावर असणाऱ्या कर्मचारी पोलीस अधिकारी व भगिनी आणि गावी जाणारे गरजू लोक.यांची त्यांनी सोया केली आहे.त्यांना विचारले असता त्यांनी आम्हाला आवड आहे,व नागरिकांचे व कर्मचाऱ्यांचे हाल होऊ नये म्हणून आम्ही करत आहे. असे त्यांनी सांगितले आहे.व लॉकडाऊनमुळे अनेक कामगार तसेच रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या निर्वासितांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी त्यांना स्थानिक पोलीस देखील मदत करीत आहेत. लोणी काळभोर, कदमवाकवस्ती , टोल नाका,पुणे सोलापूर रोड ,पुणे या ठिकाणी त्यांनी जेवण वाटप सुरू केले आहे. श्री. चिंतामणी इंटरप्रयजेस,व त्यांचे सहकारी अवधूत आघाव, संजीव आटोळे,प्रदुमन आघाव,शुभम आटोळे, चैतन्य आघाव,यांच्या हस्ते अशा प्रकारे कार्यक्रम हाती घेतला आहे.व त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.व यापुढेही लॉकडाऊन संपेपर्यंत ही सेवा अशीच चालू राहील,असे त्यांनी बोलताना सांगितले.
प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे