कोरेगाव येथील श्री कोरेश्वराची रथ यात्रा रद्द

20

कर्जत, २८ जुलै २०२०: नारळी पौर्णिमेनिमित्त कोरेगाव येथे भरणारी श्री कोरेश्वराची रथयात्रा कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. दिनांक २ ,३,४ ऑगस्ट रोजी कोरेगाव परिसरात जनता कर्फ्यू.

कोरेगाव येथे रथयात्रेच्या नियोजनासाठी पो. नि. सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा कमिटी व गावकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दि ३ ऑगस्ट रोजीची रथयात्रा रद्द करण्यात आली. यात्रा काळात संपुर्ण तीन दिवस (दि २,३ व ४ ऑगस्ट) जनता कर्फ्यू असेल गरज लागल्यास प्रशासकीय कर्फ्यू सुध्दा लावण्यात येईल या कालावधीत मंदीर तीन दिवस संपुर्ण बंद.

बुरुजाच्या आत कोणी ही येणार नाही. यात्रेदिवशी फक्त पाचच मानकरी, यामध्ये शेटे कोरे  पोलिस पाटील ब्राम्हण व गुरव यांनीच सर्व धार्मिक सोपस्कार पार पाडायचे आहेत. हेच मानकरी पोथी घेऊन येणार, हेच फक्त मंदिरात जाऊन पुजा, आरती व नैवेद्य दाखवून रथाला एकच (मानक-यांचाच ) हार घालून पोथी मंदिरातच ठेवून मंदिर बंद होणार.संध्याकाळी हेच मानकरी रात्रीची आरती करून मंदिर बंद करणार.

कोणी ही मंदिरात अगर रथाला दर्शनासाठी येणार नाही. अशा सुचना बैठकीत देण्यात आल्या.यावेळी बैठकीस सरपंच काकासाहेब शेळके यात्रा कमिटी अध्यक्ष अरुणराव फाळके, शिवाजी आप्पा फाळके, एकनाथ शेळके, चंदकांत देशमाने, हनुमंत आबा शेळके, माजी सरपंच बापू शेळके, पोलीस पाटील श्रीकांत फाळके व इतर ग्रामस्थ उपस्थित होते होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष