श्री स्वामी समर्थ पादुका पालखी परिक्रमेला आजपासून सुरुवात.

सोलापूर, १० नोव्हेंबर २०२२ : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणारे अक्कलकोट श्री. स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांच्या, पालखी परिक्रमेला दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात व भक्तीभावात आजपासून अक्कलकोट येथून सुरुवात झाली.

गेल्या २५ वर्षापासून श्री स्वामी समर्थ पादुका पालखी परिक्रमा काढण्यात येते, यंदाचे २६ वे वर्ष आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते श्रींच्या पादुकांचे पूजन करून तसेच देवस्थानचे मुख्य पुरोहित मोहनराव गोविंदराव पुजारी, मंदार पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुरोहित अण्णू महाराज पुजारी यांच्या उपस्थितीत, महाप्रसादालयातुन पुढे शमीविघ्नेश मंदिर, श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, समाधी मठ, श्री खंडोबा मंदिर येथील पूजना नंतर श्री स्वामी समर्थ महाराज की जय या जयघोषात गुरुवारी श्रीक्षेत्र अक्कलकोट येथून पालखीचे प्रस्थान झाले.

श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २५ वर्षापासून हा उपक्रम होत आहे.

श्री स्वामी समर्थ पादुका पालखी परिक्रमा ही पुढील सहा महिने कर्नाटक, गोवा राज्यासह, महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या विभागातून जाणार आहे. या पालखी प्रस्थान प्रसंगी असंख्य भविकांसह, सेवेकरी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा