मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये ‘धडक’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट यशस्वी ठरल्यावर जान्हवीने आपली पावलं दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीकडे अर्थात टॉलिवूडकडे वळवली आहेत.
दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या एका चित्रपटात जान्हवी हि अभिनेता विजय देवरकोंडासोबत झळकणार आहे.
दिग्दर्शक पुरी जगन्नाथ हे सदरील चित्रपटात आलिया भट्ट किंवा कियारा अडवाणी, अन्यना पांडेला घेऊन हा चित्रपट करणार होते. मात्र या तीनही अभिनेत्रींनी वेगवेगळ्या कारणांमुळे नकार दिल्यावर पुरी यांना करण जोहरने जान्हवीचे नाव सुचवले.
दरम्यान, याविषयी पुरी तसेच जान्हवी यांनी अधिकृत माहिती दिली नसली तरी जान्हवीला दाक्षिणात्य चित्रपटात पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.