श्रीगोंदा, दि.१६ मे २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यातील तहसीलदार यांनी दुकानांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
सोमवारपासून संपुर्ण तालुका बंद करण्यात येणार असून फक्त मेडिकल आणि दवाखाने खुले राहतील.
मंगळवार आणि बुधवार या दिवशी चपल,शुजची दुकाने, जनरल स्टोअर्स, झेराॅक्स,गिफ्ट गॅलरी, चष्मा दुकाने,वस्तु भंडार, कुशन, बांगडी, फर्निचर दुकाने इ.
गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी इलेक्ट्रॉनिक दुकाने, इलेट्रिकल दुकान, मोबाईल शाॅपी,मोबाईल रिपेरिंग,बांधकाम व्यावसायिक संबंधी, मार्बल, सायकल दुकाने, फोटो दुकाने , कुंभार इ.
शनिवार आणि रविवार या दिवशी हार्डवेअर,प्लायवूड,टू-व्हिलर,फोर व्हिलर दुकाने ,रेडीमेड कपड्याची दुकाने, कापड दुकान, वाॅशिग सेंटर, ईस्री, प्रिंटिंग प्रेस, गॅरेज, अॅाफसेट प्रिंटिंग , इ. दुकाने ही चालू राहतील.
रोज चालू राहणारे मेडिकल बेकरी दुध किराणा कृषी सेवा केंद्र शेती व्यवसायाशी संबंधी दुकाने इ रोज चालूच राहणार आहेत.
बंद राहणारी दुकाने : श्रीगोंदा तालुक्यातील सर्व आठवडे बाजार बंद राहील. हाॅटेल, रसवंती गृह , परमीट रूम, बीयर बार, स्वीट होम, सलुन, पान टपरी, ब्युटी पार्लर, चहा, भेळ, इ बंद राहील.असे वेळापत्रक तहसीलदार यांनी तयार केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष