गोल पोस्ट गुन्हा श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव येथे दरोडा

श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव येथे दरोडा

श्रीगोंदा, दि.२७ मे २०२०: श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव येथील ढवळेवस्ती परिसरात रात्री ३ वाजण्याच्या सुमारास घराच्या दरवाज्याची कडी कोयांडा तोडून घरातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ८२ हजार असा एकूण १ लाख ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात राजू शिवाजी ढवळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर नाहित अशी की, तालुक्यातील खांडगाव येथील ढवळेवस्ती येथील राजू शिवाजी ढवळे यांच्या घराच्या दरवाज्याची कडी कोयांडा तोडून दि.२६ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घरात घुसून घरातील सामानाची उलथा पालन करत शेती डेव्हलपिंगसाठी बँकेतून आणलेले ८२ हजार रूपये रोख रक्कम तसेच ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस, २० हजार रूपये किमतीचे गंठण, १२ हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या असा एकूण १ लाख ६२ हजार रुपयांची सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी झाल्याचे दर्शनास आले.

याबाबत ढवळे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खबर दिली. याबाबत खबर मिळताच श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी हे करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version