गोल पोस्ट महाराष्ट्र श्रीनगरच्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये ग्रेनेड हल्ला

श्रीनगरच्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये ग्रेनेड हल्ला

जम्मू-कश्मीरमधील श्रीनगर मध्ये हरी सिंह हाईट स्ट्रीटजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला.
 हरी सिंग मार्गावर सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करण्याच्या हेतूनं हा हल्ला करण्यात आला. यात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.
 ग्रेनेड हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या. सध्या सुरक्षा दलांनी हा संपूर्ण परिसर ताब्यात घेतला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सध्या या भागात सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.
 काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्वपदावर आल्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये श्रीनगरमध्ये हल्ला झाला आहे.
 विशेष म्हणजे सुरक्षा व्यवस्था भेदून दहशतवाद्यांनी हा ग्रेनेड हल्ला केला. यामुळे जम्मू-कश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उगारले जात आहे.
error: Content is protected !!
Exit mobile version