मुंबई, ३० ऑगस्ट २०२२: भारताचा युवा सलामीवीराचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका मुलीसोबत डिनर डेट करताना दिसत होता. कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. तसं पाहायला गेलं तर, आतापर्यंत अनेक क्रिकेटर आणि अभिनेत्री नात्यात अडकले.
आता पुन्हा क्रिकेट विश्वातील आघाडीचा खेळाडू आणि बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीमध्ये प्रेमाचा गुलाब फुलत असल्याची चर्चा रंगत आहे. नुकतंच अभिनेत्री सारा अली खानला भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शुभमन गिलसोबत पाहिलं गेलं. एका रेस्टॉरंटमध्ये हे दोघं एकत्र होते.
व्हायरल झालेल्या चित्राबाबत संभ्रम आहे. काही रिपोर्ट्समध्ये ते दुबईचे तर काही लंडनचे चित्र असल्याचे सांगितले जात आहे. फोटोमध्ये दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना दिसत आहेत. मात्र, सध्या टीम इंडिया यूएईमध्ये आशिया कप २०२२ खेळत आहे. मात्र तो या संघाचा भाग नाही.
शुभमन गिलचं नाव सारा तेंडुलकर बरोबर बऱ्याच काळापासून जोडले जात होतं आणि या दोघांच्यात प्रेम कहाणी सुरु असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांत रंगल्याचे पाहायला मिळालं होतं. दोघांनी या गोष्टीला कधीच दुजोरा दिला नव्हता. पण तरीही काही दिवसांपूर्वी दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या. दोघांनी प्रेमकहाणीपासून ते ब्रेकअपपर्यंत मौन कायम ठेवलं आहे. दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव