पुणे, दि.१२ सप्टेंबर:सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर मधील सर्व Covid-19 रुग्णालयांना भेट देण्याची मोहीम हाती घेतली आहे.
रुग्णांशी संवाद साधून आणि सुविधांचा आढावा घेण्याबरोबरच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चिंता समस्या समजून घेण्यासाठी ही भेट घेणार असल्याचे सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.
मोहिमे अंतर्गत दत्ता भाऊ खाडे ,आनंद छाजेड, गणेश नाईक आणि राजू पिल्लई यांच्या समवेत बोपोडी येथील द्रौपदी बाई खेडेकर हॉस्पिटल येथील सेंटरला भेट दिली.
यावेळी रुग्णालयाच्या प्रभारी डॉ. स्वाती बढीये यांच्या सोबत चर्चा ही केली . रुग्णालयाच्या वतीने डॉ. स्वाती बडे यांनी विनंती केल्या नुसार एक्स रे मशीन्स, दोन अनुभवी डॉक्टर आणि सिओव्हीआयडी 19 ची गरज भासणार असल्याचे त्यानीं सांगितले.त्यासोबत रुग्णांसाठी अतिरिक्त मनुष्यबळाची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.
ही सर्व व्यवस्था लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रक्रियेत आहोत असे सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे