इंदापूर, दि. २७ जून २०२० : इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवकाने कोरोनाच्या संकटामध्ये अनेक गरजू कुटुंबीयांना मदत केली. संपूर्ण जगभरासह देशावर ओढवलेल्या अस्मानी संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले. यातच सिद्धेश्वर सारख्या युवकाने आणि त्याच्या वडिलांनी विचार केला की आपण एका कुटुंबाला दैनंदिन जीवनासाठी लागणारा पैसा म्हणून रोख पाचशे रुपये व पाचशे रुपयाचा किराणामाल व तरकारी देऊ असे प्रत्येक कुटुंबाला १००० रुपये प्रमाणे १०१ गावातील कुटुंबीयांना व बाहेर गावांमधील सुद्धा कुटुंबीयांना मदत केली.
तसेच परप्रांतीयांना सुद्धा सलग पाच दिवस ४० किलोमीटर अंतरापर्यंत खाण्यापिण्याची व्यवस्था केली. सदर काम करीत असताना प्रसिद्धीपासून दूर राहून अनेकांना मदत केली. याच केलेल्या कामाची पोच पावती म्हणून इंदापूर येथील जयहिंद प्रतिष्ठान ने कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन त्याला सन्मानित केले.
यावेळी आपण लोकांना निःस्वार्थ पणे मदत केली. भविष्यात देखील गरजूंना मदत करण्याचा मानस असल्याचे थोरात यांनी न्यूज अनकट अशी बोलताना सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे