सिद्धु मुसेवाला हत्याकांड, गँगस्टर बिश्नोई चा भाचा जेरबंद!

4

पंजाब, ३० ऑगस्ट २०२२: प्रसिध्द पंजाबी रॅप गायक आणि काँग्रेस चे नेते शुभदीप सिंग उर्फ सिद्धु मुसेवाला यांची २९ मे २०२२ रोजी मानसा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पंजाब मध्ये आलेल्या आम् आदमी पार्टी च्या सरकारने त्यांची सुरक्षा व्यवस्था काडून घेतल्या नंतर अवघ्या २४ तासा च्या आत त्यांची हत्या करण्यात आली.

मुसेवाला प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सिद्धू मुसेवाला प्रकरणाचा तातडीने तपास व्हावा अशी मागणी मुसेवाला चाहत्यांनी केली होती. या प्रकरणात पोलिसांनी अझरबैझान मधून लॉरेन्स बिश्नोईच्या भाच्याला अटक केली आहे. मुसेवाला हत्याकांडाचे धागेदार परदेशात सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लॉरेन्स बिश्नोईच्या भाच्या चे नाव सचिन असून तो या प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याचे बोलले जात आहे. सिद्धु मुसेवाला प्रकरणात तपास यंत्रणा ही अधिक सक्रिय झाली असून त्यांनी वेगानं तपासाला सुरुवात केली आहे. यापूर्वी बिष्णोईची कसून चौकशी करण्यात आली होती. पुण्यात सुद्धा या हत्येचे कनेक्शन असल्या संबंधीची एक बातमी या दरम्यान व्हायरल झाली होती. तसेच खेडमधून एकाला अटकही करण्यात आले आहे. सिद्धु मुसेवाला प्रकरणानं काही दिवसांपासून वेगळं वळण घेतलं असल्याने तपास यंत्रणेला प्रयत्नांची शर्थ करुन चौकशी करावी लागत आहे. लॉरेन्स बिष्णोईचा भाचा सचिन हा विदेशातून गँग ऑपरेट करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुसेवालाची हत्या होणार असल्याची माहिती सचिनला देखील होती. असा तपास यंत्रणेला संशय आहे. त्यामुळे सचिन ला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून कोणती माहिती समोर येते हे देखील महत्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसेवाला हे प्रकरण चर्चेत आल्याने त्या विषयी उलट सुलट प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसेवालाच्या हत्येनंतर प्रसिद्ध गायक बादशहा आणि मिक्का सिंग यांना देखील जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.

तपासयंत्रणेचा असा दावा आहे की सचिनच्या सांगण्यानुसार त्याचा मित्र संदीप उर्फ केकडानं सिद्धुची हत्या करण्यापूर्वी रेकी केली होती. सिद्धुला भेटण्यासाठी केकडा त्याचा फॅन म्हणून गेला होता. त्यानं त्याच्यासोबत सेल्फी काढली आणि तो तिथेच बसून होता आणि त्या रोल मधून बाहेर आल्यावर त्यानं शुटर्सला त्या संबंधी पूर्ण माहिती दिली. त्यानंतर शुटर्सनं फायरिंग करत मुसेवाला ची हत्या केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा