शर्टवर सही करा आणि घरी येण्याचे वचन द्या, इमरान खान यांनी घेतली जीव वाचवलेल्या मुलाची भेट

लाहोर, ५ नोव्हेंबर २०२२ : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान, यांनी शौकत खानम रुग्णालयात जीवरक्षक तरुण इब्तिसामची भेट घेतली. इम्रान यांनी हल्ल्याच्या वेळी घातलेल्या शर्टवर सही केली आणि बरं झाल्यावर घरी येण्याचं आश्वासन दिलं. या भेटीचा एक व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलाय, ज्यामध्ये इब्तिसमने आदल्या दिवशी घातलेल्या शर्टवर इम्रान खान सही करताना दिसत आहेत. स्वाक्षरी करताना इम्रान खान यांनी तरुणांना देशाचा नायक म्हटलंय.

इम्रान खान यांनी तरुणांना देशाचा हिरो असं वर्णन करताना इब्तिसम म्हणाला की, तुम्ही देशाचे हिरो आहात. माझी आई देखील तुमची मोठी समर्थक आहे. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि हे दोन दिवस त्यांच्यासाठी खूप कठीण गेले. इम्रान खान यांनी तरुणाला वचन दिलं की, जेव्हाही मी वझीराबादला येईल तेव्हा इब्तिसमच्या घरी नक्की जाईल. माजी पंतप्रधानांनी आपल्या सहकाऱ्यांना हे वचन लक्षात ठेवण्यास सांगितलं. प्राणघातक हल्ल्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांची मुले कासिम आणि सुलेमान यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर हल्ला…

इम्रान खान हे त्यांच्या हकीकी आझादी मोर्चाचा भाग म्हणून पंजाब प्रांतातील वझीराबाद येथे होते. तेव्हा त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. शौकत खानम रुग्णालयातून झालेल्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच देशाला संबोधित करताना खान म्हणाले की, त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. या हल्ल्याबाबत मी नंतर सविस्तर बोलंन, असा दावा त्यांनी केला. मला वझीराबाद (पंजाब प्रांतात) किंवा गुजरातमध्ये ठार मारण्याची त्यांची योजना होती हे मला एक दिवस आधी समजलं होतं. मला चार गोळ्या लागल्या, असं खान यांनी ४५ मिनिटांच्या भाषणात वक्तव्य केलं.

उजव्या पायाचं हाड तुटलं…

क्रिकेटमधून राजकारणात आलेल्या खान यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर फैसल सुलतान सांगतात की, इम्रान खान यांच्या उजव्या पायाचे टिबिया (पायाचे मुख्य हाड) तुटलं आहे. ते म्हणाले, स्कॅनमध्ये (एक्स-रे) उजव्या पायात जी रेषा दिसते ती मुख्य धमनी (रक्तवाहिनी) आहे. देशाच्या शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात मोर्चा काढणारे खान यांचा ताफा गुरुवारी पंजाबच्या वजीराबाद जिल्ह्यात पोहोचला तेव्हा दोन बंदूकधार्‍यांनी त्यांच्या कंटेनर-ट्रकवर गोळीबार केला. या हल्ल्यात खान यांच्या उजव्या पायाला गोळी लागली.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा