सरन्यायाधिश शरद बोबडे यांचा नागपूर येथे होणार नागरी सत्कार

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आज सायंकाळी ५ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात नागपूरचे सुपुत्र आणि सध्या विधी क्षेत्रात देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झालेले सरन्यायाधीश शरद बोबडेंचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
या भव्यदिव्य नागरी सत्कार कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन समिती आणि आयोजन समितीचे गठन करण्यात आले आहे.
मार्गदर्शन समितीमध्ये सेवा निवृत्त न्यायमूर्ति विकास शिरपूरकर, खासदार विकास महात्मे, खा.कृपाल तुमाने. आ.गिरिष व्यास आ. अनिल सोले, आ.ना.गो.गाणार प्रा. जोगेंद्र कवाडे, पोलिस आयुक्त डॉ.भूषण कुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवीन्द्र ठाकरे, माजी उर्जा मंत्री चंद शेखर बावनकुळे, भंते सुर ई ससाई, इ. आयोजन समितीमध्ये शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा समावेश असून या भव्यदिव्य आयोजनाला संस्मरणीय बनविण्याचे आवाहन उपमहापौर मनिष कोठे आणि आयुक्त अविनाश बांगर यांनी केले आहे.
तसेच भूपृष्ठ परिवहन, महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात येईल.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, उर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितिन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपपीठाचे प्रशासकिय न्यायाधीश न्या. रवी देशपांडे यांची उपस्थिति राहील. विशेष अतिथि म्हणून विधानसभेतील विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर संदिप जोशी भूषवतील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा