उदगीर, २१ फेब्रुवारी २०२४ : मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण लागू करावे, याचप्रमाणे लिंगायत समाजास आरक्षण द्यावे तसेच धनगर समाजाची मागणी मान्य करावी या मागणीसाठी आज उदगीर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
पुरोगामी महाराष्ट्रात गरिबी व बेकारी प्रचंड वाढली आहे. शेतीचे तुकडे झाल्यामुळे उपजीविकेचे साधनेही कमी झाले आहे. त्यामुळे मुस्लिम, लिंगायत समाजास आरक्षण देणे गरजेचे आहे. देशाला एकसंध ठेवण्यासाठी संविधान हाच एकमात्र दुवा असून ही घटना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली आहे. त्यामुळे २६ जानेवारी बाबासाहेबांची प्रतिमा ठेवूनच ध्वजारोहण करावे अशीही मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र संघर्ष अभियानाच्या वतीने केलेल्या एकदिवसीय धरणे आंदोलनात बाबासाहेब सुर्यवंशी, मनोहर गायकवाड, मारोती तलवाडकर, दशरथ वाघमारे, बाबासाहेब कांबळे आदींचा सहभाग होता.
न्यूज अनकत प्रतिनिधी : सुधाकर नाईक