दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

नागपूर, २२ डिसेंबर २०२२ दिशा सालियन मृत्यूचे प्रकरण चांगलेच पेटले आहे. या प्रकरणाचे पडसाद आज गुरुवार रोजी विधानसभेत उमटले. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काल आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी आज केली. ही मागणी मान्य करत, दिशा सालियान प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पोलिसांकडे केस सुरु आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे याचे पुरावे आहेत त्यांनी ते द्यावे. दिशा सालियन केस कधीही सीबीआयकडे गेली नाही. सुशांतसिंग यांची केस सीबीआयकडे होती. नविन पुरावे आले असतील तर त्यांची चौकशी केली जाईल.

  • आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

एका ३२ वर्षाच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलं आहे, त्यामुळे बदनामीचे प्रयत्न सुरु आहेत,अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे म्हणाले की, शिंदेंच्या घोटाळ्यावर बोलू नये यासाठी सालियान प्रकरण काढले आहे. हवी ती चौकशी करा, मी घाबरत नाही. ३२ वर्षाच्या तरुणानं सरकारला हादरवून सोडलंय. यामुळे सत्ताधारी घाबरले आहेत. घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे, असे टीकास्त्र त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सोडले आहे.

ज्या पद्धतीने बदनामी करण्यात येते आहे ती थांबावी यासाठी मी राष्ट्रपतींना विनंती करणार आहे. यांच्याही मुला-मुलींची अशीच बदनामी केली तर काय वाटेल? असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी उपस्थितीत केला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा