दिल्लीतील परिस्थिती अनियंत्रित, पुरामुळे अनेक भागात पाणी तुंबले

नवी दिल्ली, १३ जुलै २०२३ : दिल्लीत मागच्या काही दिवसात अतिवृष्टी झाली, त्यामुळे मैदाने, दुकाने आणि घरात अजूनही पाणी आहे. सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. कुणी विचारही केला नसेल की दिल्लीत इतका मोठा पाऊस होईल. पावसाने थैमान घातल्यानंतर दिल्लीतील उद्भवलेल्या परिस्थितीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे. यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली असून, पावसाने मागच्या ४० वर्षातला रेकॉर्ड मोडला आहे.हजारो लोकांना आपल्या घरात पाणी शिरल्यामुळे इतर ठिकाणी स्थलांतरीत व्हावे लागले आहे.
आज सकाळी यमुना नदीची पाण्याची पातळी २०८.४१ मीटरवरती पोहोचली होती. हा सुध्दा एक रेकॉर्ड झाला आहे.

यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे काही परिसरात पाणी भरले आहे. पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्यामुळे रस्ते बंद कऱण्यात आले आहेत. अनेक सरकारी कार्यालयात सुध्दा पाणी भरले आहे. १६ हजार पेक्षा अधिक लोकांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.आईटीओ, राजघाटला जाणार रस्ता, आउटर रिंग रोड, यमुना बाजार आणि लोहा पुल परिसरात पाणी भरले आहे. दिल्ली आईटीओच्या जवळ आईपी स्टेडियम आणि राजघाट परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर पाणी पाहायला मिळत आहे.

उत्तर भारतात मागच्या कित्येक दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. देशाची राजधानी एका मोठ्या पुरामुळे अडचणीत सापडली आहे.दिल्लीत ३० शाळा बंद केल्या आहे. जोपर्यंत परिस्थिती सुरळीत होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा आदेश काढला आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी शासन स्तरावरती वेगवान हालचाली सुरू आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा